Pune : मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील जांभूळवाडी पुलावरील एक लेन दुरुस्तीच्या कामासाठी राहणार बंद

एमपीसी न्यूज – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील(Pune) पुणे-सातारा लेनवरील जांभुळवाडी पुलावर विस्तारीत संयुक्त दुरुस्तीचे काम सुरू केल्याने येत्या 4 ते 20 जानेवारी दरम्यान जांभूळवाडी पुलावरील एक लेन दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे.

दुरुस्तीची कामे करण्यासाठी जांभुळवाडी पूल परिसरात वाहतूक प्रवाहात तात्पुरते (Pune)बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक, पुणे शहर, यांनी याबात पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

Pimpri : सावित्रीबाई फूले यांच्या जयंतीनिमित्त भिम शक्ती कमिटीच्यावतीने अभिवादन

यानुसार 4 ते 20 जानेवारी पर्यंत जांभुळवाडी पुलावरील साताऱ्याकडे जाणाऱ्या तीन मार्गांपैकी एक मार्ग तात्पुरता बंद राहणार आहे. या कालावधीत साताऱ्याकडे जाणारी वाहतूक उर्वरित दोन लेनमधून वळविण्यात येणार आहे.

वाहतुकी मधील बदल हा एक सावधगिरीचा उपाय आहे. प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे आणि जांभुळवाडी पुलाच्या विस्तारीकरणाच्या संयुक्त दुरुस्तीच्या कामाच्या कालावधीसाठी लागू केलेल्या तात्पुरत्या वाहतूक व्यवस्थेचे पालन करण्याचा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.