Pune : जादूटोणा करत व्यावसायाकाची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – जादूटोणा करून एका व्यावसायिकाची सुमारे (Pune)अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना कॅम्प परिसरातून अटक केली आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते दोघेजण पसार झाले होते.

अब्दुल हुसैन हसनअली नईमाआबादी (वय 40), सीमा नादीर नईमाआबादी (वय-35, दोघे रा. कॅम्प,पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.तसेच त्यांचे साथीदार नादीर, शोएब मैनुद्दीन अत्तार (वय 35 रा. बोपोडी), माजीद उस्मान अत्तार (वय 50, रा. बोपोडी), खालिद मैनुद्दीन अत्तार (वय 40 रा. बोपोडी) आणि इरम शोएब अत्तार (वय 32 रा. बोपोडी) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतीफ (रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Pune : मुलीचा खून करुन पसार झालेल्या बापाला तीन तासात बेड्या, दारुच्या व्यसनावरून झाले होते मुली सोबत भांडण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा नईमाआबादी ,(Pune)शोएब आणि नादीर यांनी फिर्यादीला आयात-निर्यातीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. शेख यांनी विश्वास ठेवून वेळोवेळी आरोपींच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. परंतु परतावा मिळत नसल्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावर शोएबने जादूटोणा करून फिर्यादीला गुंगीकारक पाणी पिण्यास दिले. तावीज बनवून देण्यासाठी पैसे घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. हि कारवाई समर्थ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांनी यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.