Pimpri : पिंपरी न्यायालयात वकिलांसाठी कायदेविषयक व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – पिंपरी न्यायालयात पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार (Pimpri) असोसिएशनच्या वतीने वकिलांसाठी कायदेविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष डॉ. ॲड. सुधाकरराव आव्हाड यांचे व्याख्यान झाले.

बुधवारी (दि. 5) नेहरूनगर येथील न्यायालयात हा व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बार असोसिएशनचे सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर राजेश रणपिसे, सदस्य ॲड. स्वप्निल वाळुंज, ॲड. प्रशांत बचूटे, ॲड. पवन गायकवाड, वकील बांधव आणि विधी महाविद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते.

Maval : गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या अंगावर खेळत होता विषारी नाग

डॉ. ॲड. सुधाकरराव आव्हाड यांनी स्पेसिफिक रिलीफ अँक्ट व त्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दुरुस्त्या या विषयावर व्याख्यान दिले. त्याविषयीच्या बुकलेट्सचे यावेळी वकिलांना वाटप करण्यात आले.

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ व कार्यकारणीमार्फत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. मारुती भापकर, तर माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. ॲड. सुधाकरराव आव्हाड यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान चिन्ह देत सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात (Pimpri) दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.

उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे यांच्या वतीने बार असोसिएशनला 18 खुर्च्या देण्यात आल्या. सूत्रसंचलन ॲड. गणेश शिंदे व ॲड. विश्वेश्वर काळजे यांनी केले. ॲड. मंगेश नढे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.