Maval : धक्कादायक! आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील हायस्कूलमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरा

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील हायस्कूलच्या आंबी कॅम्पसमधील (Maval) शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात व्यवस्थापनानेच सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कॅमेरा लावला आणि विद्यार्थ्यांना ठराविक धर्माची प्रार्थना म्हणायला लावत असल्याचा आरोप करीत डॉ. डी. वाय पाटील कॅम्पसमधील शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

कोट्स अलेक्झांडर असे मारहाण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. शाळेच्या आवारात पळवून-पळवून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि पालकांनी अलेक्झांडर यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. याचा व्हिडीओ मंगळवारी (दि. 4) सायंकाळी सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

पालकांनी यापूर्वी मुलींच्या स्वच्छतागृहात बसवलेल्या कॅमेऱ्याबाबत अलेक्झांडर यांना भेटून विचारणा केली होती. तेव्हा देखील जाब विचारण्याच्या मुद्दयावरून वाद झाले होते. त्यातच स्वच्छतागृहाच्या सामायिक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्याची बाब मावळ परिसरात पसरली.

Pimpri : पिंपरी न्यायालयात वकिलांसाठी कायदेविषयक व्याख्यानमाला

त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह पालकांनी शाळेत जाऊन याबाबत शाळा व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यानंतर कारमधून निघून जाण्याच्या तयारीत असलेल्या अलेक्झांडर यांना शाळेच्या (Maval) आवारात पळवून-पळवून मारहाण करण्यात आली. यामध्ये अलेक्झांडर यांचा शर्ट फाटला. अलेक्झांडर मुर्दाबाद आणि ठराविक धर्मची शिकवण चालणार नाही अशा स्वरूपाच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी शाळा परिसरात दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अलेक्झांडर यांनी मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा बसवला. तसेच ठराविक धर्माची प्रार्थना म्हणायला लावतो याबाबतचा तक्रार अर्ज तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत सावंत म्हणाले, “पालकांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. स्वच्छतागृहातील वस्तूंचे नुकसान होत असल्याने स्वच्छतागृह दिसणार नाही पण सामाइक परिसर दिसेल अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचे शाळा व्यवस्थापन सांगत आहे. अलेक्झांडर यांना धक्काबुक्की झाली असून, पालकांनी दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे महिला अधिकाऱ्यांद्वारे शाळेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. तसेच चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

Maval : गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या अंगावर खेळत होता विषारी नाग

दीड महिन्यापूर्वी बसवला कॅमेरा –

आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये विविध विभागांची कॉलेज आहेत. तसेच शाळा देखील आहे. या शाळेच्या स्वच्छतागृहातील बेसिन, आरसे, लाईटची बटणे वारंवार तोडली जात आहेत. नुकसान केले जात आहे. त्यामुळे स्वच्छता गृहातील बेसिन असलेला परिसर (कॉमन एरिया) मध्ये व्यवस्थापनाने दीड महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता.

नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया –

अलेक्झांडर यांचे पालकांशी असलेले वर्तन आणि त्यामुळे उडणारे वारंवार खटके यामुळे हा कॅम्पस पिंपरी-चिंचवडमधील अन्य कॅम्पसच्या तुलनेत कायमच चर्चेत राहिला आहे. पहिली ते दहावीच्या शाळेचे मुख्याध्यापक असणाऱ्या अलेक्झांडर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या पुस्तकात एक प्रार्थना आहे. ही प्रार्थना ठराविक धर्माची असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता. अलेक्झांडर यांना जाब विचारत पळवून पळवून मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ट्विटरवर अपलोड करताना ‘जय श्रीराम’च्या घोषणांचे गाणे या व्हिडीओला जोडण्यात आले आहे. या प्रकाराबाबत हजारो नेटिझन्सनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.