Sangavi : टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार, एकाला अटक

एमपीसी न्यूज – चार अल्पवयीन मुले व एका तरुणाने मिळून (Sangavi) तिघांना मारहाण करत एकावर कोयत्याने वार केले आहेत. हा प्रकार नवी सांगवीतील कृष्णा चौक येथे बुधवारी (दि.4) रात्री घडला आहे.

याप्रकरणी शिरिष विनायक गायकवाड (वय 21 रा.नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी हुसेन इनाम शेख (वय 19 रा.बाणेर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Maval : धक्कादायक! डॉ. डी वाय पाटील आंबी येथील मुलींच्या स्वच्छता गृहात सीसीटीव्ही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र रितेश शितोळे व विनायक मुलताणी हे चौकात उभारले असताना आरोपी दुचाकीवरून 4 अल्पवयीन मुलांना घेऊन आला.

यावेळी त्याने तू भांडणात का पडतोस म्हणत फिर्यादी यांच्यावर जिवे ठार मारण्याच्या इराद्याने पायावर कोयत्याने वार केले. तसेच बांबूने व लोखंडी रॉडने पाठीवर मारत (Sangavi) फिर्यादी व त्यांच्या मित्रांना जखमी केले. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.