Maval : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणाऱ्या एका पादचाऱ्याला अज्ञात (Maval) वाहनाने धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 6) पहाटे जुना पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे येथे घडली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटविणे अशक्य आहे. वय अंदाजे 40 ते 45 वर्ष आहे. श्रीकांत घोडमोरे यांनी या अपघाताबाबत वडगाव मावळ पोलिसांना माहिती दिली आहे. श्रीकांत हे गुरुवारी पहाटे लोणावळा येथून पुणे शहराकडे जात होते. ते पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास कान्हे गावच्या हद्दीत साईसेवाधाम समोर आले असता त्यांना एक व्यक्ती छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडल्याचे आढळले.

Sangavi : टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार, एकाला अटक

याबाबत श्रीकांत घोडमोरे यांनी तात्काळ वडगाव मावळ पोलिसांना माहिती दिली. मयत अनोळखी (Maval) व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. मयत व्यक्तीच्या अंगावरून वाहन गेल्याने शरीराचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.