Maval : गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या अंगावर खेळत होता विषारी नाग

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथील  (Maval) चौराई नगरमध्ये एका मजूर कुटुंबाच्या घरात अत्यंत विषारी असलेला नाग (स्पेक्टीकल कोब्रा) वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांनी पकडला. मध्यरात्री महिला गाढ झोपेत असताना तिच्या अंगावर हा नाग खेळत होता. त्यामुळे महिलेला जाग आली आणि महिलेसह तिच्या कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला.

विलास गायकवाड हे उर्से येथील एका कंपनीत काम करतात. रात्री उशिरा ते कामावरून घरी येत असताना त्यांना चौराई नगर येथे एका घरात साप असल्याची माहिती मिळाली. मध्यरात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास गायकवाड यांनी चौराईनगर येथे धाव घेतली. त्यावेळी घरातील पलंगावर अत्यंत विषारी असलेला नाग फणा काढून बसला होता.

विलास गायकवाड यांनी नागाला पकडले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. महिलेचे दैव बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले अशा भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. हा नाग चावल्यानंतर त्याच्या विषाचा मानवी शरीरावर तत्काळ प्रभाव पडतो. वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यूचाही धोका असतो.

जुन्या पद्धतीचे घर आहे. घराच्या मागील बाजूला एक फट आहे. त्यातून नाग आतमध्ये आला असावा. पलंगाची देखील उंची जास्त नसल्याने तो पलंगावर सहजपणे चढला. त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याचे विलास गायकवाड यांनी सांगितले.

PCMC : बदलत्या राजकीय समीकरणामुळे भाजपच्या ‘अबकी बार सौ पार’ला ‘ब्रेक’?

आम्ही चार ते पाच जणांना फोन केले. मात्र कोणीही प्रतिसाद (Maval) दिला नाही. शेवटचा उपाय म्हणून विलास गायकवाड यांना फोन केला असता त्यांनी तत्काळ येऊन आम्हाला मदत केली असल्याच्या भावना संबंधित कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.

एकाच ठिकाणी दोन साप रेस्क्यू –

विलास गायकवाड बुधवारी दुपारी कंपनीत कामावर जात होते. त्यावेळी त्यांना चौराई नगर येथे साप असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन त्या सापाला पकडून उर्से येथे नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यानंतर रात्री पुन्हा त्याच परिसरात विषारी नाग आढळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.