Pimpri : पिंपरी न्यायालयात ‘क्रिमिनल ट्रायल’ विषयावर व्याख्यान संपन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे ( Pimpri ) वकिलांसाठी कायदेविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुरुवारी (दि. 17) पार पडले. यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ, बार कॉऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी उपाध्यक्ष ॲड. अहमदखान पठाण यांनी ‘क्रिमिनल ट्रायल’ या विषयावर वकिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर राजेश रणपिसे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, सदस्य ॲड. स्वप्नील वाळूंज, सदस्य ॲड. प्रशांत बचूटे, सदस्य ॲड. नितिन पवार, माजी अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ, माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, माजी अध्यक्ष ॲड. किरण पवार, माजी अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Wakad : पादाचाऱ्याचा मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक

कार्यक्रमात क्रिमिनल ट्रायल बाबतच्या माहिती पुस्तिकांचे वकिलांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड ॲड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. महेश नागरगोजे, तसेच जेष्ठ विधिज्ञ ॲड. संपत भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रिमिनल केस कशी चालवावी, ती प्रक्रिया कशी असते .

याबाबत ॲड. अहमदखान पठाण यांनी विस्तृतपणे सांगितले. ॲड. महेश नागरगोजे यांनीही मार्गदर्शन केले. जेष्ठ विधिज्ञ ॲड. संपत भुजबळ यांनी बार असोसिएशनच्या व्याख्यानमालेसाठी 11 हजार रुपये दिले.

सूत्रसंचालन ॲड. विश्वेश्वर काळजे व सचिव ॲड. गणेश शिंदे यांनी केले. ॲड. राजेश रणपिसे यांनी ( Pimpri ) आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.