Pimpri : शाळांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावणे अनिवार्य करा; रयतची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शासकीय व खासगी शाळेत (Pimpri )महापुरुषांच्या प्रतिमा लावणे अनिवार्य करण्याची मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांना निवेदन दिले आहे. (Pimpri )त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय व खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. पण, केवळ पुस्तकी शिक्षण घेणे म्हणजे ज्ञान नव्हे तर आज आपण या देशात कोणामुळे आहोत,आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार कोणामुळे मिळाला ? आपण पारतंत्र्यातून स्वतंत्र देशात कोणामुळे आलो ? आपल्याला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला ? आपला देश घडवण्यासाठी कोणी कोणी आपले आयुष्य समर्पित केले. या सर्व गोष्टीची जाण विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे.

Amazon Pay : ‘अॅमझोन पे’ला पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून मान्यता

तंत्रज्ञानाचे युग असताना सुद्धा खुप मोठी शोकांतिका आहे कि आजच्या विद्यार्थ्यांना व तरुणांना काही ठराविक महापुरुष सोडले तर इतर महापुरुष कोण आहेत ? त्यांचे नाव काय ? त्यांचे कार्य काय याबाबत माहिती नसते. अशा विद्यार्थ्यांना शालेय जीवनपासून आपल्या आदर्श महापुरुषांची ओळख होणे गरजेचे आहे. शहरात मोठ्या प्रमाणात शाळा आहेत. परंतु, काही ठराविक शाळा सोडल्या तर अनेक शाळा महापुरुषांच्या प्रतिमा लावत नाहीत.  महापुरुषांची जयंती साजरी करत नाहीत.

 

त्यामुळे विद्यार्थी देखील यापासून अनभिज्ञ राहतात. शहरातील सर्व खासगी, शासकीय शाळांना परिपत्रक काढून सर्व महापुरुषांच्या प्रतिमा शाळेत लावण्यास आदेशित करावे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.