Amazon Pay : ‘अॅमझोन पे’ला पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून मान्यता

एमपीसी न्यूज – भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Amazon Pay ला पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून मान्यता दिली आहे. पेटीएम वरील निर्बंध आणि त्यानंतर Amazon Pay ला दिलेल्या मान्यतेमुळे पेमेंट अॅग्रीगेटर कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

Amazon ही ई कॉमर्स क्षेत्रात काम करणारी आघाडीची कंपनी आहे. 20 फेब्रुवारी रोजी या पेमेंट अँपला पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून आरबीआयने मान्यता दिली. आता Amazon कडून त्यांच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुलभता निर्माण करून दिली जाणार आहे.

जीवन सुलभ करण्यासाठी तसेच व्यापारी आणि ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी Amazon वचनबद्ध आहे. हा परवाना आम्हाला आमचे वितरण चॅनेल अधिक मजबूत करण्यास आणि संपूर्ण भारतातील आमच्या व्यापारी आणि ग्राहकांसाठी त्यांना सुरक्षित, सोयीस्कर आणि फायद्याचे डिजिटल पेमेंट अनुभव प्रदान करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्यास फायदेशीर ठरणारा असल्याचे Amazon Pay कडून सांगितले जात आहे.

Pimpri: एक किलो गांजासह तरुणाला अटक

Amazon कंपनीकडे पूर्वीसूनच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) परवाना आहे. त्यामुळे Amazon कडून काही वॉलेट सेवा दिल्या जात आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 या कालावधीत Amazon सह Zomato, Juspay, Decentro, Mswipe, Zoho, Stripe अशा दहा कंपन्यांना पेमेंट अॅग्रीगेटरचा पर्याय मिळणार आहे.

Amazon वरून खरेदी करताना इतर पेमेंट अॅग्रीगेटरच्या माध्यमातून पेमेंट करावे लागत होते. आता Amazonला त्याचा परवाना मिळाला असल्याने ग्राहकांना Amazon वरून खरेदी करताना पेमेंटची सुलभता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.