Talegaon Dabhade : नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्थांना भेटी महत्त्वाच्या – प्राचार्य मलघे

एमपीसी न्यूज – शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण (Talegaon Dabhade) हा नव्या शिक्षण धोरणाचा गाभा आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित संस्था, कंपन्या, आस्थापना आदींना भेटी देऊन तिथे होणाऱ्या दैनंदिन कामाचा अनुभव, माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने इंद्रायणी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने अर्थशास्त्र आणि बँकिंग विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई स्थित भारतीय रिझर्व बँक आणि मुंबई शेअर बाजार या दोन संस्थांना शैक्षणिक भेट आयोजित केली. याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल, अशी माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी दिली.

या भेटी दरम्यान इंद्रायणी महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई शेअर बाजारात प्रत्यक्षात जाऊन तेथील कामकाज कसे चालते याची माहिती घेतली. तसेच तेथील कार्यालयास भेट देऊन शेअर मार्केट संदर्भात चालू घडामोडी कशा अभ्यासल्या जातात याची ही माहिती घेतली. याच संदर्भात ब्रोकर फोरम या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना व्याख्यानाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

मुंबई शेअर बाजाराच्या भेटीनंतर इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय रिझर्व बँकेच्या मुद्रणालय संग्रहालयास भेट दिली. या भेटीतून विद्यार्थ्यांना भारतीय चलन प्रणालीची पद्धती प्रत्यक्षात बघता आली. तसेच पुराण काळापासून ते आज पर्यंत भारतीय (Talegaon Dabhade) चलनामध्ये कसा बदल होत गेला आणि भविष्यात काय बदल होऊ शकतो याचा अंदाज प्रत्यक्षात अनुभवता आला.

आत्तापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माहीत असलेल्या भारतातील दोन मुख्य आर्थिक संस्था या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बघता आल्या, यामुळे याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीत उपयोग होईल, असेही प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले.

ही शैक्षणिक भेट यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ.सत्यम सानप, प्रा.डॉ.अर्चना जाधव, प्रा. डॉ. सदाशिव मेंगाळ, प्रा. रूपकमल भोसले आणि प्रा.अर्चना काळे यांनी नियोजन केले.

या शैक्षणिक भेटीस विभाग प्रमुख के. व्ही.अडसूळ, प्राचार्य एस.के.मलघे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा दिल्या.

SSC Student News : वाहतूक कोंडीचा दहावीच्या परीक्षार्थींना बसतोय फटका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.