Pimpri : नेशन हेल्प ग्रुपकडून दररोज साडे दहा हजार लोकांना भरवला जातोय मायेचा घास

एमपीसी न्यूज – अग्रसेन भवन आणि अग्रवाल समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेशन हेल्प ग्रुप’ची सुरुवात करण्यात आली. लोकांच्या सहकार्याने व आर्थिक मदतीने पिंपरी-चिंचवड परिसरातील गरजू व गरीब असणाऱ्या तब्बल साडेदहा हजार लोकांना दररोज ‘नेशन हेल्प ग्रुप’ यांच्याकडून मायेचा घास भरवला जात आहे.

अग्रसेन अन्नपूर्णा रसोई येथे सर्व सुरक्षेची काळजी घेऊन अन्न तयार केले जाते. तयार केलेले अन्न शहरातील विविध भागात वितरीत केले जाते. नेशन हेल्प ग्रुप च्या वतीने रेशन धण्याचे किट, फळे व इतर जीवनावश्यक वस्तूंची देखील गरजू नागरिकांना वितरण केले आहे.

या ग्रुपच्या माध्यमातून दररोज तब्बल साडेदहा हजार लोकांना दोन वेळचे जेवण पुरवले जाते. या सेवेचा संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या विद्यार्थी, मजदूर, हातावरचे पोट असणारे कामगार व गरीब लोकांना लाभ मिळत आहे.

‘नेशन हेल्प ग्रुप’तर्फे शहरातील विविध 30 पेक्षा अधिक ठिकाणी अन्नाचे वितरण केले जाते. त्यांच्या या कामगिरीबद्दल अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी नेशन हेल्प ग्रुपचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांच्या सहीत रमेश अग्रवाल, मुकेश मित्तल, संदीप गुप्ता, नवीन बंसल, अमन अग्रवाल, भीमसेन अग्रवाल, प्रेमचंद्र मित्तल, विनोद बंसल, सुजित गर्ग, सुशील मित्तल, विनोद मित्तल, आशिष अग्रवाल, कमलराज बंसल, जोगिंदर मित्तल, गोपाल अग्रवाल, ओमकार पारीक व केटरिंग स्टाफ यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.