Pimpri News : शासकीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा ऑगस्टपासून सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri News) आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या सयुंक्त विद्यमाने शासकीय जिल्हास्तरीय अंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 ही ऑगस्ट महिन्यापासून सुरु होण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड म.न.पा. गटाकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या मार्फत पुढच्या मंगळवारी (दि 25) सकाळी 10.30 ते 4.00 या वेळेत रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे नियोजन करण्यात आले आहे.

आयोजन संबंधी चर्चा करणेकामी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सन 2023-24 या वर्षीसुद्धा सन 2022-23 वर्षाप्रमाणे सर्व खेळांच्या प्रवेशिका ऑनलाईन स्विकारल्या जाणार असून, खेळाडूंची नोंदणी, प्रवेशिका नोंदणी या बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, तसेच स्पर्धा आयोजन स्थळासंबंधीही चर्चा होणार आहे.

Pimpri : शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत गुरुवारी मेळावा

म.न.पा. शाळा व्यतिरिक्त, खाजगी शाळा (संस्था) विविध खेळांच्या शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यास इच्छुक असल्यास, त्याबाबतची पत्रेही या सभेत स्विकारली जाणार आहेत. शासनाने प्रत्येक शाळेस किमान 2 सांघिक खेळामध्ये मध्ये व एका वैयक्तिक खेळामध्ये सहभागी होण्याचे सक्तीचे केले (Pimpri News) असल्यामुळे, शाळा प्रमुखांनी आपले शाळा मधील जास्तीत जास्त संघ सहभागी करावेत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सर्व म.न.पा. शाळांच्या प्राथमिक/माध्यमिक व सर्व खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी क्रीडा शिक्षक (शारीरिक शिक्षण) व संगणक ऑपरेटर यांना मंगळवारी बैठकीला बोलावले आहे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.