_MPC_DIR_MPU_III

Pimpri news: पत्रकार बजरंग राजीवडे यांचे निधन

0

एमपीसी न्यूज – पत्रकार बजरंग राजीवडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज (गुरुवारी) निधन झाले. त्यांचे वय 42 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

मावळ तालुक्यातील राजेवाडी गावचे रहिवासी असलेले पत्रकार बजरंग राजीवडे यांनी दैनिक पुण्यनगरीत बातमीदार काम केले. सध्या ते ‘टाइम्स नऊ’ हे वृत्त संकेतस्थळ चालवत होते. त्यांना चित्रपटाची आवड होती. त्यांनी दोन शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती.

_MPC_DIR_MPU_II

चार दिवसांपूर्वी दुचाकीवरून जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यांना पॅरॅलिसीसचा झटका आला होता. त्यांच्यावर कासारवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर उपचारादरम्यान आज त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सतत हसतमुख आणि मनमिळावू स्वभावाच्या राजिवडे यांचे निधन झाल्याची वार्ता एकूण पिंपरी चिंचवडच्या पत्रकार वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मावळातील चांदखेड शेजारील दिवड-राजेवाडी गावात आज रात्री नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment