Pimpri News : पिंपरी गावात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन

एमपीसीन्यूज : पिंपरी येथील श्री. संदीप वाघेरे युवा मंच व रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरजू नागरिकांसाठी येत्या बुधवारी ( दि. 27) मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी गाव येथील जेष्ठ नागरिक संस्थेचे विरंगुळा केंद्रात सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे शिबीर होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, शिबिरात नागरिकांची रक्तदाब, ई. सी. जी., 2 डी ईको व हृदयरोग तपासणी करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वाघेरे यांनी केले आहे.

या शिबिराचे आयोजन श्री. संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरिष वाघेरे, राजेंद्र वाघेरे, शुभम शिंदे, श्रीकांत वाघेरे, सामाजिक कार्यकर्त्या रंजना जाधव यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.