-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Division Corona Update : पुणे जिल्ह्यातील 3.61 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 96.35 टक्क्यांवर

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 74 हजार 736 झाली आहे. त्यापैकी 3 लाख 61 हजार 051 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या 4 हजार 790 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 4 नवीन कोरोना स्ट्रेनच्या बाधित रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात आजवर 8 हजार 895 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.35 टक्के आहे तर, मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे.

पुणे विभाग
विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 78 हजार 955 झाली आहे. विभागातील 5 लाख 56 हजार 547 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रीय रुग्ण संख्या 6 हजार 479 आहे. विभागात 15 हजार 929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.13 टक्के आहे तर, मृत्यूचे पमाण 2.75 टक्के इतके आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

कालच्या (दि. 21) बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधित रुग्णाच्या संख्येमध्ये एकूण 611 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 456, सातारा जिल्ह्यात 72, सोलापूर जिल्ह्यात 42, सांगली जिल्ह्यात 24, कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

विभागामध्ये काल (दि.21) बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकुण 736 आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 619, सातारा जिल्ह्यामध्ये 33, सोलापूर जिल्ह्यामध्ये 44, सांगली जिल्ह्यामध्ये 18 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभाग सर्वेक्षण
पुणे विभागात आजपर्यंत एकूण 35 लाख 77 हजार 324 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. पाप्त अहवालापैकी 5 लाख 78 हजार 955 नमून्याचा अहवाल सकारात्मक (Positive) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.