PCMC News: उपायुक्त,सहाय्यकआयुक्तांच्या कामकाजात फेरबदल; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले. (PCMC News) उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे आरोग्य तर सचिन ढोले यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी दिली आहे.

महापालिका प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने कामकाजाचे फेरवाटप केले आहे. सहाय्यक आयुक्तांकडील विभाग कमी करुन उपायुक्तांकडे दिले आहेत. कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांच्याकडील दक्षता व गुणनियंत्रण विभाग काढला आहे.  अतिक्रमण निर्मूलन, पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागाची अधिकची जबाबदारी सोपविली आहे.

 

Dehuroad News: वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करा – श्रीजित रमेशन

 

समाज विकास विभाग, महिला बालकल्याण, दिव्यांग योजना विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे आरोग्य विभाग दिला आहे.  माहिती व तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्र, दक्षता व गुणनियंत्रण  विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्याकडे दक्षताच्या तांत्रिक बाबींसह क्रीडा विभाग सोपविला आहे. (PCMC News) सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभाग कायम ठेवत समाज विकास विभागाची नव्याने जबाबदारी सोपविली आहे.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडील झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभाग सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे सोपविला आहे.  कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडील आकाशचिन्ह व परवाना विभाग काढला आहे. महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे उपायुक्त चारठाणकर यांनी 1 ऑगस्ट 2022 पासून आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारावा असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.