Dehuroad News: वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करा – श्रीजित रमेशन

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी फसवणुकीच्या अत्यंत गंभीर प्रकरणात जाणीवपूर्वक एफआयआर दाखल केला नसल्याचा आरोप करत त्यांची बदली करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केली आहे. (Dehuroad News) रमेशन यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून  बदलीची मागणी केली. 

तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत असे सांगत रमेशन म्हणाले, देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी फसवणुकीच्या अत्यंत गंभीर प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. त्या प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत.

ACB Action: अंगणवाडी कामाचे बजेट मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारणारे दोन अधिकारी जाळ्यात

सर्व पुरावे देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवून तपशील मागविण्यात आला. मागितलेले तपशील देहूरोड पोलीस स्टेशनला प्राप्त झाले आहेत. जे स्पष्टपणे सिद्ध करतात की गुन्हा घडला आहे. परंतु आजपर्यंत एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोप रमेशन यांनी केला. नुकत्याच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल दोघांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.(Dehuroad News) त्यानुसार पाटील यांची बदली करावी. तसेच त्यांच्याविरोधात खटला चालविण्याची परवानगी पोलीस महासंचालकाकडे मागतली असल्याचे रमेशन यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.