PCMC News: मुख्य आरोग्य निरीक्षकाचा जातीचा दाखला बोगस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका मुख्य आरोग्य निरीक्षकाने अनुसूचित जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे. (PCMC News) त्यामुळे त्या निरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

सुनील वाटाडे हे त्या निरीक्षकाचे नाव आहे. ते महापालिकेचे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून काम करीत असून वाटाडे यांनी जात प्रमाणपत्र काढले.(PCMC News) पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने जातीचा पहिला दाखला 6 सप्टेंबर 1997 ला अवैध ठरविला. ही बाब त्यांनी महापालिका प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवून फसवणूक केली आहे. तसेच अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच, त्यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत.

 

ACB Action: अंगणवाडी कामाचे बजेट मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारणारे दोन अधिकारी जाळ्यात

 

याप्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य मुख्य कार्यालय आणि फ क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्तांकडे शिफारस अहवाल दिला आहे. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र जप्त आणि रद्द केल्याची बाब विचारात घेता त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. तसेच 15 दिवसांत दोषारोप ठेवण्याची कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.