Maval News : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने दिंडीतील वारक-यांना रुग्णवाहिका आणि औषधांचे वाटप

एमपीसी न्यूज – मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने पायी चालत जाणा-या दिंड्यांमधील वारक-यांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा आणि मोफत औषधे वाटप केले जात आहे. (Maval News) हा उपक्रम श्री क्षेत्र देहु, आळंदी ते पंढरपूर तसेच मावळ तालुक्यातील सर्व दिंड्यातील वारक-यांसाठी व इतर दिंड्यातील वारक-यांसाठी सुरू आहे. या उपक्रमांमुळे अनेक वारकर्‍यांना मदत होत आहे.

 

मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार शिवराम भसे, सचिव-रामदास गणपत पडवळ, कार्यकारिणी सदस्य हभप बजरंग घारे, आरोग्य समिती अध्यक्ष हभप सुनिल महाराज वरघडे, आरोग्य समिती सचिव निलेश शेटे, विभागप्रमुख संजयमहाराज बांदल. कायदेशीर सल्लागार हभप सागर शेटे, सोनाली शेलार, हभप भाऊसाहेब रासे, रसिका चव्हाण, योगेश गवळी यांचे विशेष सहकार्य आहे.

 

 

 

सदर उपक्रमाचे आयोजन हभप श्रीमंत रमेशसिंहजी व्यास(डायरेक्टर ए.वन.चिक्की.लोणावळा) यांनी केले आहे.त्याच्याकडूनच औषधे उपलब्ध करुन दिली जात आहेत.(Maval News) तसेच पंचायत समिती मावळ आरोग्य अधिकारी व स्पर्श हाॅस्पिटलचे डाॅ अमित वाघ यांनी औषध पुरवठा करुन मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.