ACB Action: अंगणवाडी कामाचे बजेट मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारणारे दोन अधिकारी जाळ्यात

एमपीसी न्यूज: अंगणवाडीच्या कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी लाच मागून ती स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. (ACB Action) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लष्कर परिसरातील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 
उप अभियंता किरण अरुण शेटे (वय 31) आणि शाखा अभियंता परमेश्वर बाबा हेळकर (वय 49) अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिरगाव येथील अंगणवाडीत इलेक्ट्रिक कामे आणि पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्यासाठीच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी आरोपींनी एका ठेकेदाराकडे अडीच हजार रुपयाची लाच मागितली होती. (ACB ACtion) या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात सापळा रचून या दोघांना पैसे घेताना रंगेहात पकडले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.