Chitra Wagh: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, संजय राठोड सोबतचा लढा सुरूच राहील – चित्रा वाघ

एमपीसी न्यूज: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपनच्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या सोबतचा लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केलाय. (Chitra Wagh) चित्रा वाघ या बुधवारी लोणी काळभोर परिसरात आल्या होत्या. यावेळी त्यांना संजय राठोड हे भाजप सेना युती सोबत आहेत, त्यामुळे त्यांच्या बाबतच्या गुन्ह्याचे काय होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. 

 

चित्रा वाघ म्हणाल्या शिवसेना नेते संजय राठोड यांच्या केस बाबतचा माझा लढा सुरूच राहणार आहे. संजय राठोड यांना मिळालेल्या क्लीन चीट बाबत पुणे पोलीस आयुक्तांना विचारा. (Chitra Wagh) राज्यात नव्याने भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले आहे. त्यानंतरही आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या माझी लढाई अजूनही सुरूच आहे. प्रकरण कोर्टात आहे.
पुणे पोलिसांनी कोणत्या आधारावर संजय राठोड यांना क्लीन चीट दिली आहे हे मला माहित नाही. त्याबद्दल आता पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहे. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्या विरोधात माझा हा लढा सुरूच राहणार आहे अशी भूमिका त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.