Pavana Dam: पावसाची धुवांधार बॅटिंग; धरणातील पाणी साठ्यात वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चोवीस तासात 55 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (Pavana Dam) त्यामुळे धरणातील पाणीसाठा 2.6 टक्क्यांनी वाढला आहे. तर, मागील चोवीस तासात लोणावळा परिसरात 146 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. (Pavana Dam) सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. यंदा उन्हाळा तीव्र होता. जून महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणी कपातीचे संकट आले होते. परंतु, 1 जुलै पासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे.

MPC News Podcast 7 July 2022 – ऐका… आजचे एमपीसी न्यूज पाॅडकास्ट

पवना धरणातील परिस्थिती!

गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 55 मि.मि.

1 जूनपासून झालेला पाऊस = 392 मि.मि.

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 545 मि.मि.

धरणातील सध्याचा पाणीसाठा = 19.45 टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 34.28  टक्के

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 2.6 टक्के

1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 2.6 टक्के

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.