Katraj Land Slide: मुसळधार पाऊस सुरू असतानाच कात्रज घाटात दरड कोसळली

सुदैवाने अपघात नाही

एमपीसी न्यूज:  बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असतानाच कात्रज घाटामध्ये दरड कोसळण्याचा प्रकार उघडकीस आला. अवघ्या शंभर मीटर अंतरावर पी एम पी एम एल बस असताना डोंगरावरून भले मोठे चार दगड येऊन रस्त्यावर पडले. (Katraj Land Slide) सुदैवाने यात कोणताही अपघात झाला नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्वरित या परिसरात धाव घेऊन रस्त्यावरील दगड बाजूला केले आणि रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला केला. 
मागील तीन दिवसांपासून पुणे शहर परिसरात आणि डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आधीच कळवले होते. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर यंत्रणा सतर्क आहेत. बुधवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास पीएमपीची कोंढानपूरच्या दिशेने जाणारी बस कात्रज बोगद्यापासून 100 मीटर अंतरावर असताना अचानक डोंगरावरून भले मोठे दगड घरंगळत खाली आले. बसचे चालक अमर चव्हाण यांनी तत्काळ याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली.

Pune Blackmail Case : सेक्सची ऑफर देत दोन तरुणींनी ब्लॅकमेल करत 18 लाख उकळले, गुन्हा दाखल

त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी आणून हा सर्व रस्ता मोकळा केला. राडारोडा बाजूला केला. सध्या कात्रज घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.