Pimpri News: सीमावासीयांना बळ देणाऱ्या ठरावाचे कष्टक-यांकडून स्वागत

एमपीसी न्यूज – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Pimpri News) यांनी वादग्रस्त विधाने केल्याने सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी सीमा भागातील नागरिकांची बाजू कायम रस्त्यावर व सभागृहात लाऊन धरली. महाराष्ट्र विधानसभेतील सर्वपक्षीय नेत्यांनी सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी अवघा महाराष्ट्र एक उभा असल्याची ग्वाही दिली. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह सीमा भागातील 865 गावातील एक इंच ही जमीन देणार नाही, हा निर्णय घेतला. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे जाहीर स्वागत करण्यात येत असल्याचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सांगितले.

महासंघातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे की, कर्नाटक सरकारचा जुलूम, अन्याय, अत्याचार गेल्या सहा सहा दशकांपासून तेथील मराठी बांधव सहन करीत आहेत. तेथे मराठी अस्मिता जिवंत ठेवण्याचे काम निकराने करीत आहेत. त्यांना समर्थन देण्याची व पाठिंब्याची नितांत गरज होती.

Pimpri News: ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सर्व प्रभागांमध्ये राबविण्याचा मानस – आयुक्त सिंह

विरोधीपक्ष नेते अजित पवार व विरोधी पक्षाने (Pimpri News) हा विषय विधिमंडळात लावून धरला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हा ठराव मांडला आणि तो सर्वांनी एकमताने मंजूर केला. काल कर्नाटकचे कायदा मंत्री मधुस्वामी व आमदार सवदी यांनी खोडसाळपणे मुंबईवर दावा केला, ही माहिती अजितदादा यांनी दिली यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निषेध केला. महाराष्ट्र हिताच्या या विषयावर महाराष्ट्र राज्य विरोधी कुठली शक्ती काम करत असेल. तर, त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये मतैक्य होत असल्याचा संदेश या निमित्ताने दिला गेला आहे याचे स्वागतच व्हावे, असेही नखाते यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.