Pimpri News: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी जमा केलेल्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शहर शिवसेनेच्या वतीने आज (शुक्रवारी) सोमय्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

पिंपरी चौकात झालेल्या आंदोलनात शहरप्रमुख सचिन भोसले, उर्मिला काळभोर, निलेश मुटके, अनंत कोऱ्हाळे, वैशाली मराठे आदी सहभागी झाले होते.

सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सोमय्यांच्या प्रतिमेला जोडेही मारले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.