Chinchwad Bye-Election : प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. अज्ञातांनी हा हल्ला केला. (Chinchwad Bye-Election) त्यात भोसले जखमी झाले असून त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना डांगे चौक मंगलनगर येथे आज (बुधवारी) सायंकाळी घडली.

Chinchwad Bye-Election : मतदारांना घरपोच व्होटर स्लीप वाटप

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा शहरप्रमुख भोसले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जात प्रचार करत होते. त्याचवेळी तिथे आलेल्या काही जणांनी भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. त्यात भोसले यांच्या हाताला दुखापत झाली आहे. (Chinchwad Bye-Election) राष्ट्रवादीचे कार्यकर्ता गोरख पाषणाकर याचा पाय मोडला आहे. दोघांनाही उपचारासाठी  बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.