Pune News : सर्वोत्तम कामगिरीसह अर्जुन, सुखमीत राष्ट्रीय नौकानयन (रोईंग) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

एमपीसी न्यूज : ऑलिम्पियन अर्जुन लाल जाटसह आंतरराष्ट्रीय पदकविजेते सुखमीत आणि हवालदार नारायण यांनी बुधवारी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय नौकानयन (Pune News) (रोईंग) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लष्कराच्या सीएमई येथील आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर ही स्पर्धा सुरु आहे. 

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागी अर्जुनने अजय त्यागीसह 7 मिनिटे 3.29 सेकंद अशी वेळ देताना लाईटवेट डबल्स स्कल्स प्रकारात सर्वोत्तम वेळेसह अव्वल स्थान पटकावले.

अर्जुनपाठोपाठ 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत क्वाड सुवर्णपदक विजेत्या सुखमीतने दोन शर्यतीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. डबल स्कल्स प्रकारात सुखमीतने झक्कर खानच्या (Pune News) साथीत 7 मिनिट 1.30 सेकंद अशी वेळ दिली. त्यानंतर चौघांच्या स्कल्स प्रकारात सुखमीत, झक्कर, अरविंदर, सलमान जोडीने 6 मिनिट 34.77 सेकंद अशी वेळ देत उपांत्य फेरी गाठली.

Chinchwad Bye-Election : प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला

खुल्या डबल स्कल्स प्रकारात सेनादलाच्या परमिंदर आणि शगनदीप या प्रमुख जोडीने 7 मिनिट 7.55 सेकंद अशी वेळ दिली. दरम्यान, पोलंडमध्ये 2022 च्या जागितक नौकानयन स्पर्धेत कांस्यदक विजेत्या नारायणने पॅरा सिंगल स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने 8 मिनिट 30.21 सेकंद अशी वेळ दिली.

पहिल्या दिवशी 20 मिहला आणि 34 पुरुष विभागातील शर्यती झाल्या. त्यापूर्वी, स्पर्धेचे उदघाटन सीएमईचे प्रमुख  मेजर जनरल विनायक सैनी यांच्या हस्ते करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.