Chinchwad Bye-Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड-शो, नागरिकांची गर्दी

एमपीसी न्यूज – चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी (Chinchwad Bye-Election) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (बुधवारी) वाकडमध्ये भव्य रोड शो केला. उघड्या गाडीतून लोकांना अभिवादन करत निघाले तेव्हा नागरिकांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांसोबत रोड शोमध्ये उमेदवार अश्विनी जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, भरत गोगावले,  उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप सहभागी झाले होते.

Pune News : सर्वोत्तम कामगिरीसह अर्जुन, सुखमीत राष्ट्रीय नौकानयन (रोईंग) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

वाकड येथील दत्त मंदिरापासून मुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड-शोला सुरुवात झाली. दत्त मंदिर रोडने थेरगावमधील डांगे चौक, दत्तनगर जुना जकात नाका, चिंचवडमधील चापेकर चौक, गांधीपेठ पॉवर हाउस चौक, केशवनगर, काळेवाडीतील एम. एम. हायस्कूल, कुणाल हॉटेल पासून पुढे (Chinchwad Bye-Election) विमल गार्डन समोरून शिवेंद्र लॉन्सपर्यंत त्यांनी भव्य रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले. त्यांची छबी मोबाईल कॅमेऱ्याने टिपताना लोक दिसत होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.