Chinchwad Bye-Election : मतदारांना घरपोच व्होटर स्लीप वाटप

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरु आहे. गटस्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या 510 बीएलओ तसेच 84 नोडल अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना घरपोच व्होटर स्लीप वाटप केल्या जात आहेत. (Chinchwad Bye-Election) तसेच मतदारांना मतदान केंद्र कुठे आहे याबाबतची माहिती देखील दिली जात आहे. सुमारे 5 लाख 68 हजार व्होटर स्लीप वाटण्याचे नियोजन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया निर्भयपणे स्वच्छ वातावरणात पार पाडली जावी यासाठी निवडणूक प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली असून मतदानाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रत्येक मतदाराने विचारपूर्वक आपला मताधिकार बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी केले आहे.      या मतदार संघातील मतदार निवडणूक प्रक्रीये पासून दूर राहू नये यासाठी विशेष प्रयत्न  केले जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येत आहे.

Talegaon Dabhade : आनंदाच्या वातावरणात बारावीच्या परीक्षेला सुरुवात

सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच विविध सोसायट्यांमधून छोट्या-छोट्या कार्यक्रमाद्वारे, पथनाट्याद्वारे कलाकारांच्या माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. मागील मतदानावेळी कमी संख्येने मतदान झालेल्या भागांवर (Chinchwad Bye-Election) लक्ष केंद्रीत करून विशेष मोहिम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात 510 मतदान केंद्र असून या केंद्रांवर दिव्यागांसाठी सुविधा उपलब्ध असणार आहे.

दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सहाय्य  करण्याकरिता स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून भरारी पथक, गस्ती पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. शिवाय  पोलीस यंत्रणेद्वारे महत्वाच्या नाक्यांवर संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. आचारसंहिताभंगाच्या तक्रारी असतील तर नागरिकांनी सी-व्हिजील अॅपवर तात्काळ तक्रार दाखल करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

निवडणूक मतदान कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचा-यांना कामकाजाच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले गेले आहे. चिन्हांकित मतदार याद्या अंतिम करणे, टपाली मतदानाचे नियोजन करणे, साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचारीवर्गाचे प्रशिक्षण घेणे, (Chinchwad Bye-Election) मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृतीच्या ठिकाणी पार्किंगची पुरेशी सोय करणे, आदी कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून यातील बहुतेक कामे पूर्णत्वास गेली आहेत.  मतदान प्रक्रियेसाठी तसेच कर्मचा-यांना ने-आण करण्यासाठी पीएमपीएलच्या बसेससह इतर वाहनांची सोय करण्यात आली असून खबरदारी म्हणून या वाहनाना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे, अशी माहिती  ढोले यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.