Talegaon Dabhade : आनंदाच्या वातावरणात बारावीच्या परीक्षेला सुरुवात

एमपीसी न्यूज – बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या केंद्र क्रमांक 101 अंतर्गत पाच उपकेंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.(Talegaon Dabhade) इंद्रायणी महाविद्यालय, कांतीलाल शहा विद्यालय, ॲड पु.वा परांजपे विद्यालय,बालविकास विद्यालय,आदर्श विद्यामंदिर या ठिकाणी सुमारे 2094 विद्यार्थी तसेच आपत्कालीन 14 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इंग्रजी विषयाची परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी दिली.

‘कॉपीमुक्त परीक्षा’ या अभियानानुसार परीक्षेमध्ये झालेले अनेक बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.यावर्षी प्रथमच रनरच्या माध्यमातून परीक्षा सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर पर्यवेक्षकाने,दोन विद्यार्थ्यांच्या सह्या घेऊन त्यांच्यासमोर  प्रश्न पत्रिकेचे पाकीट फोडायचे आहे. याची व्हिडिओद्वारे चित्रीकरण करण्यासाठी रनरची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्याला परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे तसेच परीक्षेसाठी पेपर संपल्यानंतरचा दहा मिनिटं वेळ वाढून दिलेला आहे तसेच केंद्राच्या जवळ 144 जमावबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे.

Pimpri News : ‘वयाच्या 68 व्या वर्षीच वयाच्या नव्वदीतील नियोजन पूर्ण – श्रीनिवास ठाणेदार

केंद्र संचालक म्हणून उपप्राचार्य प्रा.अशोक जाधव हे काम पाहत असून उपकेंद्र संचालक म्हणून प्रा.  संदीप भोसले आणि केंद्र समन्वयक म्हणून प्राचार्य डॉ.संभाजी मलघे काम पाहत आहेत. कोरोनाच्या नंतर होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले. (Talegaon Dabhade) याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री.रामदास काकडे,संस्थेचे  कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.