Chinchwad Bye-Election : निवडणूक साहित्याचे शनिवारी होणार वाटप, कर्मचा-यांना दिले प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2023 च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप मतदान दिवसाच्या (Chinchwad Bye-Election) आदल्या दिवशी 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज कामकाजासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

प्रारंभी, निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत सेक्टर अधिकारी आणि संगणक चालक यांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षण दिले. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि आवश्यक कामकाज याबद्दल या प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती आणि सूचना देण्यात आल्या. यानंतर साहित्य स्वीकृती आणि वाटप कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे पार पडणार आहे. साहित्य वाटप करण्याकरीता 111 कर्मचारी तर स्वीकृतीसाठी (Chinchwad Bye-Election) 148 कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम सोपविण्यात आले आहे.

Pimpri News : ‘वयाच्या 68 व्या वर्षीच वयाच्या नव्वदीतील नियोजन पूर्ण – श्रीनिवास ठाणेदार

साहित्य वाटप व स्वीकृती कामकाज खूप जबाबदारीचे आणि काळजीपूर्वक करण्याचे काम आहे. प्रत्यक्ष निवडणूकीतील मतदानाच्या कामकाजामधील हा महत्वपूर्ण टप्पा असून ह्या कामात चूक झाल्यास संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. सर्व कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी, नियंत्रण पथक नियुक्त केली आहे. या कामकाजामध्ये हलगर्जीपणा न करता सर्वांनी समन्वयाने काम करावे,अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

मतदानाच्या आदल्या दिवशी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेपासून साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून साहित्य स्वीकृतीच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.