Pimpri News : ‘वयाच्या 68 व्या वर्षीच वयाच्या नव्वदीतील नियोजन पूर्ण – श्रीनिवास ठाणेदार

एमपीसी न्यूज : पराभवाची भीती न बाळगता सतत धोका पत्करणे हिच जीवन पद्धती आपण स्वीकारली असून आज माझे वय 68 असून पुढील बावीस वर्षांचे माझ्या (Pimpri News) जीवनाचे लेखी नियोजन तयार असल्याचे अमेरिकेतील पहिले मराठी खासदार,संशोधक व उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार यांनी आज येथे म्हटले .

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी येथे आलेल्या ठाणेदार यांनी आपल्या प्रकट मुलाखतीत आपल्या ध्येयासक्त जीवनपद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना दिली .

बेळगाव येथील मराठी कुटुंबात अतिशय खडतर जीवन जगलेले व आज अमेरिकेत उद्योजक व खासदार म्हणून काम करत असलेल्या ठाणेदार यांनी आपला सारा जीवन प्रवास (Pimpri News) या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडून सांगितला. येथील डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहात विद्यार्थी आणि तरुणतरुणींनी यावेळी गर्दीचा उच्चांक केला होता.

Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला 23 ते 25 फेब्रुवारी रोजी आयोजित

जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटणे व कार्यकारणी सदस्य सचिन इटकर यांनी ही मुलाखत घेतली. ‘महात्मा गांधीना आदर्श मानणारे डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांचा आपल्या जीवनावर प्रचंड प्रभाव असून समाजाप्रती उत्तरदायित्व असणे व सामाजिक कार्यातून जनतेची परतफेड करणे हीच समाजाची सेवा असल्याचे आपण मानतो, असे ठाणेदार म्हणाले.

अमेरिकेत सुमारे 30 टक्के नागरिक गरिबीत जीवन जगत असले तरी आपण निवडून देणारा लोकप्रतिनिधी योग्य आहे की,अयोग्य आहे ?याची पारख अमेरिकन नागरिकांना आहे .

विद्यार्थ्यांना संदेश देताना ठाणेदार म्हणाले की, कुठलेही काम करताना खचून जाऊ नका. स्वतः वरचा विश्वास तर बिलकुल गमावता कामा नये. ध्येय ,उद्दिष्ट हे निश्चित करा व सातत्याने सकारात्मक प्रयत्न करत ते गाठण्याचा प्रयत्न ठेवा,मार्ग आपोआप खुला होत जाईल. असे त्यांनी म्हटले.

भारतातील गरीब विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण अथवा नोकरीसाठी आपण सहकार्य करू तसेच अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी लागणारा कालावधी व किचकट प्रक्रिया यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी म्हटले. डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या संचालिका (Pimpri News) डॉ. स्मिता जाधव यांनीही विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.