Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला 23 ते 25 फेब्रुवारी रोजी आयोजित

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी दिली. व्याख्यानमालेचे यंदा पाचवे वर्ष आहे.

व्याख्यानमालेत 23 फेब्रुवारी रोजी मावळच्या प्राचीन लेण्यांचे वैभव या विषयावर व्याख्याते प्रा. डॉ. सत्यजीत खांडगे पहिले पुष्प गुंफणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अनिश होले उपस्थित राहणार आहेत.

Chinchwad News : वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

24 फेब्रुवारी रोजी मावळचे दुर्ग वैभव या विषयावर इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे दूसरे पुष्प गुंफतील. मयूर राजगुरव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

25 फेब्रुवारी रोजी लेखक ओंकार वर्तले मावळचे पुरातन मंदिर वैभव या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दीपक फल्ले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

ही व्याख्यानमाला स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहात दररोज सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. (Talegaon Dabhade) मावळच्या भौगोलिक इतिहासाच्या जन्मखुणा, तसेच मावळच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या लेण्या, दुर्ग आणि मंदिराची संपदा या विषयावर व्याखान होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मावळचा इतिहास जाणून घेण्याकरता या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष खांडगे यांनी केले आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.