Pimpri: महापालिका घेणार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका 22 ते 25 नोव्हेंबर 2018 या दरम्यान माजी महापौर कै. मधुकर रामचंद्र पवळे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेणार आहे. यामध्ये पुरूष खेळांडुचे 30 संघ तर महिला खेळाडुंचे 20 असे एकूण 50 संघ सहभागी होणार आहेत.

चिंचवड, पूर्णानगर येथील शनिमंदिर मैदानावर होणाऱ्या या कबड्डी स्पर्धचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहेत. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार हे उपस्थित राहणार आहेत.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण 50 संघातील महिला व पुरूष असे 700 खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडुंच्या निवासाची सोय चिखलीतील सेक्टर 17 येथील घरकुल योजना याठिकाणी केली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षिस 1 लाख 75 हजार, द्वितीय 1 लाख, तृतीय 55 हजार 555 आणि चतुर्थ 55 हजार 555 असे बक्षिसांचे स्वरूप आहे. वैयक्तीक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यात दिवसाचा मानकरी (महिला व पुरूष) 4 दिवस 40 हजार, उत्कृष्ट चढाई किंवा पकड शिवाय अष्टपैलू खेळाडू ठरणा-याला महिला व पुरूष खेळाडुंना 45 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

खेळाडुंना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही, याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार आणि क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.