Pimpri : पेट्रोलचा भाव 80 रुपयांच्या खाली !

एमपीसी न्यूज- पेट्रोल डिझेलचे दरामध्ये दिवसेंदिवस घट होत असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याचा याचा फायदा भारताला झाला आहे. आज, गुरुवारी पेट्रोलचा 79.14 रुपये तर डिझेलचा 70.51 पैसे झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी पेट्रोलच्या किंमतीने 90 चा आकडा पार केला तर आता पेट्रोल 80 रुपयांच्या खाली आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे त्याचा फायदा भारताला झाला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल- डिझेलच्या उत्पादनावरील खर्च कमी झाल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होत आहेत. सहा आठवड्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये 12 रुपयांनी तर डिझेलच्या किमतीमध्ये 13.64 रूपयांनी कपात झाली आहे.

पेट्रोल व डिझेलच्या दरांत येत्या काही दिवसांत आणखी कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशाला बसणारी झळ कमी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.