Pimpri: …..जेव्हा महापौरच दोन माजी महापौरांना रिक्षातून सफर घडवितात !

‌एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. रिक्षाचालक ते शहराचे प्रथम नागरिक पदापर्यंत यशस्वी राजकीय वाटचाल करणाऱ्या महापौरांचे पाय आजही जमिनीवर आहेत. एका कार्यक्रमानिमित्त पिंपरीत आलेल्या महापौर जाधव यांना जुन्या रिक्षाचालक मित्राने रिक्षात बसून फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. महापौरांनीही रिक्षात बसून फोटो तर काढलाच पण मित्राच्या रिक्षातून माजी महापौर अपर्णा डोके आणि वैशाली घोडेकर यांना देखील सफर घडविली. शहराचे प्रथम नागरिक होऊनही जुन्या रिक्षाचालक मित्राचा आग्रह पूर्ण करत रिक्षा चालविणाऱ्या महापौरांचे कौतुक होत आहे.

‌राजकारणात मोठ्या पदावर पोहचले की राजकीय नेत्यांच्या वागणुकीत बदल होतो. परंतु, रिक्षा चालक ते शहराचे प्रथम नागरिक असा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या महापौर राहुल जाधव यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. बुधवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरीतील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी महापौर राहुल जाधव आणि पदाधिकारी आले होते.

‌पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर जात असताना महापौर राहुल जाधव यांचा जुना रिक्षाचालक मित्र भेटला. या मित्राने महापौरांकडे रिक्षात बसून फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. महापौरांनीही रिक्षात बसून मित्रांसोबत फोटो तर काढलाच पण मित्राचा रिक्षा देखील चालविला. रिक्षातून माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका अपर्णा डोके, वैशाली घोडेकर यांना रिक्षातून सफर घडविली.

महात्मा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत त्यांनी रिक्षा चालविला. महापौर झाल्यानंतरही मित्राने आपला रिक्षा चालविल्याने रिक्षाचालक मित्र खुश झाला. तर, चक्क महापौरांनी रिक्षातून सफर घडविल्याबद्दल दोन माजी महापौरांनाही कौतुक वाटले.  शहराचे प्रथम नागरिक होऊनही जुन्या रिक्षाचालक मित्राचा आग्रह पूर्ण करत रिक्षा चालविणाऱ्या महापौरांचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.