BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : अल्पवयीन मुलाने चोरलेल्या सहा दुचाकी जप्त

99
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून चोरलेल्या सहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई गुन्हे शाखेच्या गुंडास्कॉड उत्तर विभागाने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी भागात गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना चोरलेली दुचाकी विकण्यासाठी एक अल्पवयीन मुलगा शगुन चौक, पिंपरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळली. पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून त्या मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पिंपरी, पुणे कॅम्प, शिवाजीनगर भागातून आणखीन पाच दुचाकी चोरल्याचे समोर आले.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.