BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ‘डिजीटल युगातील नोकरी क्रांतीतील कौशल्य : 2025 मधील करियर’ चर्चासत्राचे आयोजन

40
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय.एम.ई.डी.) आणि ‘जॉबीझा’ यांच्या संयुक्तविद्यमाने ‘डिजीटल युगातील नोकरी क्रांती आणि कौशल्य’ विषयावर चर्चासत्राचे आज , शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे.

कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चर्चासत्र शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी 6 वाजता आय एम ई डी, भारती विद्यापीठ, मोरे विद्यालय कॅम्पस, पौड फाटा, एरंडवणे येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

या चर्चासत्रात जितेंद्र सोनार (महाव्यवस्थापक, ऑटोलाइन इंडस्ट्रीज लि.), उद्धव जोशी (ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रा. लि., एच आर प्रमुख), नीरज गुप्ता (नॉर ब्रेमेझ टेक्नॉलॉजी सेंटर इंडिया प्रा. लि.) प्रमुख मार्गदर्शक आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.