BNR-HDR-TOP-Mobile

Dhayari : प्रेमभंगातून प्रेयसीच्या घराजवळील परिसरात स्फोट; दोघांना अटक

895
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – प्रेमभंग होणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, प्रेमभंगाच्या रागातून प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी तिच्या घराजवळच्या परिसरातील मोकळ्या जागेत स्फोट घडवला. ही घटना बुधवारी (दि.8) दुपारी तीन वाजता डी एस के रोड धायरी येथे घडली. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसर हादरला होता. तर एका घराच्या खिडकीची काच देखील फुटली होती. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोघांना अटक केली.

किशोर आत्माराम मोडक (वय 20), अक्षय राजाभाऊ सोमवंशी (वय 24), (दोघेही रा. वडकी सासवड रोड), अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी एस. के रोड धायरी येथे बुधवारी दुपारी तीन वाजता मोकळ्या जागेत स्फोट होऊन परिसरातील रामकृष्ण पेटकर यांच्या घराची काच फुटली. त्यामुळे त्यांनी याची सिंहगड रोड पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास लावत दोन तरुणांना वडकी येथून ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती सुझूकी ए स्टार (एम एच 11 ए के 6938) गाडीही ताब्यात घेतली.

त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी किशोर मोडक याची मावशी धायरी परिसरात राहते. गेल्या दोन वर्षांपासून किशोरचे मावशीच्या घरी येणे जाणे असत. या काळात मावशीच्या घराशेजारी असणा-या युवतीसोबत किशोरचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र दोन वर्षांनी काही कारणास्तव त्यांचे प्रेमसंबंध तुटून किशोरचा प्रेमभंग झाला. याच्या रागातून प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी मित्राच्या मदतीने धायरी परिसरात फटाक्याच्या दारूने स्फोट घडविला.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक करून भादवि कलम 286 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड पोलीस पुढील तपास करीत आहेत .

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.