Pimpri : करमुसे मारहाण प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी ढिसाळपणा करू नये – हिंदु विधीज्ञ परिषद

एमपीसी न्यूज – ठाणे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अनंत करमुसे यांना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आली. या प्रकरणी ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र अस्वस्थ करणार्‍या या घटनेचा निष्पक्ष आणि शीघ्रतेने तपास झाला पाहिजे. तसेच मंत्र्यांवर आरोप आहे म्हणून पोलिसांनी या तपासात ढिसाळपणा करू नये, असे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे.

या संदर्भात स्पष्टीकरण देताना जितेंद्र आव्हाड यांनी ही घटना घडली तेव्हा मी सोलापूर येथे दौर्‍यावर होतो, हा युवक माझ्याविषयी 3 वर्षांपासून पोस्ट करत होता या संदर्भात काय झाले आहे, ते मला माहीत नाही,  सांगितले आहे.  तसेच ‘तुमचा दाभोळकर करू’, अशी धमकी मिळाल्याची तक्रार आव्हाड यांनी केली आहे. महाराष्ट्र अस्वस्थ करणार्‍या या घटनेचा निष्पक्ष आणि शीघ्रतेने तपास झाला पाहिजे. तसेच मात्र मंत्री आहेत, म्हणून पोलिसांनी या प्रकरणी तपासात ढिसाळपणा करू नये, असे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे.

इचलकरंजीकर यांनी पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकप्रतिनिधींच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालये सुरू झालेली आहेत. त्यामुळे सदर प्रकरण तपासानंतर अशा विशेष जलदगती न्यायालयासमोर जाणे आवश्यक आहे. आझाद मैदान दंगलीतील दंगलखोरांना अजून शिक्षा झालेली नाही. तसे या प्रकरणात होऊ नये.

या घटनेकडे आणि निवाड्याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे.लोकप्रतिनिधींचा सहभाग असलेल्या प्रकरणांमध्ये तपास जाणीवपूर्वक ढिसाळपणे केला जातो, असा आतापर्यंत अनुभव आहे. या प्रकरणात आरोपी मंत्रीच असल्याने तपास निष्पक्षपणे केला जाईल कि नाही, अशी सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे. यासाठी या प्रकरणाच्या तपासात ढिसाळपणा करू नये, असे इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.