Pimpri : आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटीझर आणि ग्लोजचे वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे.  या  विषाणूला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. यासाठी पोलीस नागरिक मित्र संघटनेच्या वतीने  पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णवाहिका चालक तसेच आरोग्य विभाग कर्मचारी यांना मास्क, सॅनिटीझर व ग्लोजचे वाटप करण्यात आले. या सर्व वस्तू आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

या प्रसंगी प्रथमेश आंबेरकर, तेजस हटले, जितेंद्र शेखावत, स्वानंद काकडे, वर्षा हुके तसेच पोलीस नागरिक मित्र संघटनेचे सदस्य अशोक तनपुरे, राहुल श्रीवास्तव, स्मिता डेरे, गायत्री लांजेकर, विनिता आंबेरकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.