Pimpri : पराभवाच्या भीतीनेच मोदी सरकारकडून 1 लाख कोटींची तरतूद

कामगार नेते काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – केंद्र सरकार सत्तेत येऊन 9 वर्षे झाली तरीही (Pimpri) सर्वसामान्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. बेरोजगारीसह महागाई प्रचंड वाढलेली आहे, पेट्रोल,डिझेल, भाजीपाल्यासह गहू तांदूळ अशा जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मोदी सरकारवर देशातील जनता नाराज आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करून तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, या भूलथापांना महाराष्ट्रासह देशातील जनता बळी पडणार नाही अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की केंद्र सरकारकडून 1 लाख कोटी खर्च करून महागाई कमी करून काही दिवसांसाठी दिलासा दिला जाईल.

मात्र या केंद्र सरकारने राज्य सरकारने महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढवून ठेवलेली आहे. त्यामुळे असे सरकार पुन्हा येणार नाही असा सर्व्हे आल्याने कधी नाही ती भाववाढ रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, इंडिया (Pimpri) फ्रंटला मोठी संधी आहे.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुखपदी मेघा पवार

मोदी सरकार म्हणजे केवळ घोषणाबाज सरकार आहे. प्रत्यक्षात नागरिकांच्या काही हाती लागतच नाही. पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही दिवसांसाठी पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात येऊन करून भारतातील ग्राहकांना इंधन स्वस्त देण्याचे सोंग केले जाईल. महागाई वाढल्याने जनता याला बळी पडणार नाही, असेही नखाते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.