NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुखपदी मेघा पवार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP ) गटाच्या स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुखपदी मेघा पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या सेलच्या माध्यमातून बेरोजगारी महिला बचतगट, युवक, महिला यांच्यासाठी अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे.

Bhosari : बाजार भावापेक्षा कमी दरात ब्रँन्डेड वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भोसरीतील सुपर बझार

सेलच्या माध्यमातून गृह उद्योग निर्मिती, व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन, शासकीय योजनां लोकांपर्यंत पोहोचवणे, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, बाजारपेठेची उपलब्धता तसेच बचत गटाचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर काम करण्यात येणार आहे, यामुळे आर्थिक सक्षमीकरणाच्या अनेक संधी निर्माण होतील तसेच पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन, असा विश्वास मेघा पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.