Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभारी पदी सुनील भोंगाडे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारीपदी सुनील (नाना) दशरथ भोंगाडे (Maval) यांची निवड जाहीर करण्यात आली.आमदार सुनील शेळके,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे आदीं मान्यवरांच्या हस्ते कार्यकर्ता मेळाव्यात सुनील भोंगाडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

शुक्रवार (दि 23) सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुनील भोंगाडे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

एक निष्ठावंत कार्यकर्ता तसेच आमदार सुनील शेळके यांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. आपली राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि आतापर्यंत आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन आपली राष्ट्रवादी मावळ तालुका प्रभारी पदावर निवड करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

नवनिर्वाचित मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सुनील भोंगाडे यांनी अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले असून त्यांच्या निष्ठेचे आज फलित झाले. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष पदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. माळवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच,शिव शक्ती तरूण मंडळाचे आधारस्तंभ तर कडजाईमाता ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन असून,रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्या पदाला त्यांनी न्याय दिला आहे.मावळ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष असलेले सुनील भोंगाडे हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. माळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही त्यांची कारकीर्द उठावदार झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या कामात मोलाचा सहभाग आहे. भोंगाडे यांचे संघटन कौशल्य विचारात घेऊन पक्षाने त्यांच्यावर मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. तीन वर्षांच्या कार्याध्यपदाच्या (Maval) कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामामुळे गाव पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मजबूत फळी सध्याही कार्यरत आहे.

मावळ तालुक्यातील त्यांचा गाव, वस्त्या,तरुण मंडळांशी चांगला वावर असून चांगले योगदान,कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कार्यकर्ता आणि आर्थिक,दुर्लभ घटकांना मदत करणे अशी भोंगाडे यांची विशेष ओळख आहे. कार्यकर्ता, संघटन,पक्षासाठी योगदान,अशा अनेक गोष्टीमधून त्यांचा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये उत्तम जनसंपर्क आहे. तसेच तालुक्यातील एक अभ्यासू व कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून सुपरिचित असून राजकीय,सहकार,शैक्षणिक, कला,क्रिडा व सामाजिक अशा विविध क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.