Pimpri : कोहिनूर करंडक’ एकांकिका स्पर्धेची राज्यस्तरीय प्राथमिक फेरी शनिवारपासून

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, (Pimpri) पिंपरी चिंचवड शाखा, श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान, यांच्या सहकार्याने 1998 पासून कै. राम गणेश गडकरी करंडक स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्धेच्या या रौप्यमहोत्सवी टप्प्यावर, कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने नाट्यपरंपरा जपण्याचा वसा राखत यंदा ही स्पर्धा ‘कोहिनूर करंडक’ या नावाने होत असून स्पर्धेत महाराष्ट्रासह, गोवा आणि बेळगाव येथील एकांकिकांचा समावेश असणार आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्या (शनिवार, दि. 20) पासून सुरू होत असल्याची माहिती अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी गुरुवारी दिली.

स्पर्धे विषयी माहिती देताना भाऊसाहेब भोईर आणि कृष्णकुमार गोयल म्हणाले, कोहिनूर करंडक एकांकिका स्पर्धेच्या नोंदणीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये महाविद्यालयांसाह नामवंत संस्था सहभागी होत आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध केंद्रांवर होणार आहे, दि. 20 जानेवारी 2024 रोजी नाशिक केंद्रांवर प्राथमिक फेरीची सुरुवात होईल.

Pune : भारत विकास परिषदेच्या वतीने संगीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन

 

दि. 21 जानेवारी 2024 रोजी मुंबई, 23 आणि 24 जानेवारी 2024 रोजी पिंपरी चिंचवड, दि. 25 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर केंद्रांवर प्राथमिक फेरी संपन्न होणार आहे. तर अंतिम फेरी 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे पार (Pimpri) पडणार आहे. स्पर्धेच्या विस्तारा बरोबरच यंदा स्पर्धेच्या पारितोषिकांतही मोठी वाढ करण्यात आली असून प्रथम पारितोषिक 1 लाख 1 हजार रुपये करण्यात आले आहे, याशिवाय विविध पारितोषिके विजेत्यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.