Pune : भारत विकास परिषदेच्या वतीने संगीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : येत्या सोमवारी 22 जानेवारी (Pune )रोजी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखा आणि आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या वतीने गीतरामायणाबरोबरच भरतनाट्यम, पोवाजा आणि गोंधळ, फ्यूजन संगीत आणि श्रीराम अभंगवाणीचा कार्यक्रम सादर केला जाणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता चितळे व सदस्य राजेंद्र जोग यांनी आय येथे दिली. येत्या सोमवारी सायं. 6 वाजता भांडारकर संस्थेतील समवसरण अ‍ॅम्फी थिएटरमध्ये होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.

भक्ती आणि शक्तीचा संगीतमय अविष्कार असलेल्या या कार्यक्रमात दत्ता चितऴे, डॉ. भक्ति दातार, तुषार रिठे, प्रार्थना साठे, अमिता घुगरी, अमित कुंटे, दीप्ती कुलकर्णी आणि उध्दव कुंभार गीतरामायण सादर करणार आहेत तर पं. आनंद भाटे श्रीराम अभंगवाणी सादर करणार आहेत. मंदार परळीकर आणि सहकारी पोवाडा व गोंधळ तर अमिता गोडबोले भरतनाट्यम सादर करणार आहेत.

Congress : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठका

याशिवाय त्याठिकाणी अयोध्या राममंदिराच्या आंदोलनाची छायाचित्र प्रदर्शनी देखील रसिकांना पाहण्यासाठी असून कार्यक्रमाच्या ठिकाणी आतषबाजी व दीपोत्सव केला जाणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पुणेकरांनी (Pune) उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 1963 मध्ये स्थापन झालेल्या भारत विकास परिषदेच्या वतीने विविध सामाजिक कार्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी गीत गायन स्पर्धा तसेच अपंगांसाठी कृत्रिम पायांचे मोफत वाटप करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.