Congress : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठका

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Congress) पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रांताध्यक्ष, आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 जानेवारी  रोजी काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हा काँग्रेस कमिट्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सध्या संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजपने आघाडी घेतली असताना काँग्रेसनेही बैठकांना वेग घेतला आहे. त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे.

Pimple Saudagar : श्रीराम मंदिराच्या 5000 प्रतिमूर्तीचे वाटप करणार – उमेश काटे

इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागविण्यात आले आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. पुण्यात पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठका आयोजित करण्यात येत असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या बैठकांमध्ये (Congress) प्रमुख इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसतर्फे भाजपा विरोधात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.