Pimpri : माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, प्रतिभा महाविद्यालयाचे यश

एमपीसी न्यूज – माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत विद्यापीठ, महाविद्यालय (Pimpri) तरुणांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, निगडी यांनी प्रथम क्रमांक, प्रतिभा कॉलेज ऑफ एज्यूकेशन, चिंचवड, पुणे यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विजेत्यांना अनुक्रमे 41 हजार आणि 31 हजार रुपयांचा धनादेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सुपुर्द करुन गौरविण्यात आले.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त विनोद जळक, स्वच्छ भारत अभियान कक्षाच्या समन्वयक सोनम देशमुख आदी उपस्थित होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 3.0 राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या योजना प्रभावीपणे व मिशन मोड पद्धतीने राबविण्याची स्पर्धा घेण्यात येते.

स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्‍नॉलॉजी चॅलेंज या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान स्पर्धेतील (Pimpri) विजेत्यांना दिनांक 01 मे 2023 रोजी आयुक्त सिंह यांच्या हस्ते बक्षीस रक्कमेचा धनादेश सुपुर्द करुन गौरविण्यात आले.

PCMC: उपयोगकर्ता शुल्क भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद, साडेचार कोटी शुल्क जमा

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला आहे. स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धा (स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्‍नॉलॉजी चॅलेंज) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विज्ञान आश्रम टेक्‍नॉलॉजी फाऊंडेशन प्रा.लिचे रंजीत शानबाग यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर एन.के.एस. प्रा.लि.चे अरुण दिक्षीत यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. शरद सपकाळ व पंकज इंगळे यांना तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना अनुक्रमे 41 हजार, 31 हजार आणि 21 हजार रुपयांचा धनादेश आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.