Hinjawadi : कंटेनरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये जेवण (Hinjawadi) करण्यासाठी पायी जात असलेल्या तरुणीला कंटेनरने धडक दिली. यामध्ये पादचारी तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भुमकर चौक वाकड येथे घडली.

योगिता (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या मैत्रिणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक शिवशंकर जोकुराम मोरया (वय 30, रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Pimpri : माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, प्रतिभा महाविद्यालयाचे यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता आणि तिच्या दोन मैत्रिणी भुमकर चौकातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी (Hinjawadi) पायी चालत जात होत्या. भुमकर चौकातील हनुमान मंदिरासमोर त्या आल्या असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या ट्रेलरने योगिता यांना धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन योगिता यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.